Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा..

 

आज शिवराज्यभिषेक दिनानिमित्त नारायणगाव ग्रामपंचायती खाली छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक शिरूर लोकसभेचे मा.खासदार, शिवसेना उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर नारायणगावात सुरू असलेल्या विठाई साबीर लंगर जेवणाचे वाटप करण्यात आले..

आज विठाई साबीर लंगरचा बेचाळीसावा दिवस होता आजचे जेवण सुजितभाऊ खैरे यांच्या माध्य


मातून देण्यात आले होते.

लंगरचे काम अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे २०० ते ३०० गोरगरिबांसाठी एक टाईमचे जेवण देणे हे पुण्याचे काम आहे,

जुन्नर तालुक्यात हा एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे असे मनोगत शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी केले.

यानंतर शरददादा सोनवणे यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, लंगरला चाललेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

या सर्वांनी लंगरला भेट दिली त्यासर्वांचे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख शरददादा सोनवणे,

तालुका प्रमुख माऊलीशेठ खंडागळे,

असंख्य लोकांना जीवनदान देणारे राजाभाऊ पायमोडे, पंचायत समिती सदस्य जीवनभाऊ शिंदे, आंबेगावचे सुरेशभाऊ भोर, सुनील बानखिले, धनगरवाडीचे सरपंच महेशभाऊ शेळके त्यांची पत्नी, रोहिदासशेठ तांबे, माजी उपसरपंच संतोष वाजगे व सर्वच मान्यवर,

सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

दरम्यानच्या काळात जीवनभाऊ शिंदे,प्रवीण दिवटे, रामदासभाऊ अभंग,यांना वाढदिवसाच्या तर जितेंद्र भोर यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राजुरी येथे काही मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत कोव्हिड सेंटर निर्माण केले तिथे हिंदू मुस्लिम रुग्ण बांधव ऍडमिट होत आहे तालुक्यात एक सामाजिक बांधिलकी याद्वारे जपली जात आहे आज सरपंच बाबुभाऊ पाटे यांच्याही लग्नाचा वाढदिवस यानिमित्त त्या कोव्हिड सेंटरला एक साउंड आणि माईकची भेट दिली.

मधल्या काळात आपल्या सर्वांचा मित्र मंगेश डेरे यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातेवाईकांनी लंगरला ५० किलो धान्य दिले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आशिष माळवदकर यांनी केले तर आभार हेमंत कोल्हे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या