कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आप्तस्वकीय्य विधीसाठी धजावत नसताना तसेच मृतदेहांच्या वाढलेल्या संख्येचा विचार करता ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून साधारण 80 लाख रुपये खर्च करून वापरात आणलेली शवदाहिनी उपयुक्त असल्याबद्दल पारनेर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील सर्व सामान्य जनता चर्चा करताना दिसत आहे.
वनसंपत्ती वाचविण्यासाठी भविष्यात वृक्षारोपण झाले पाहिजे त्यासोबत वृक्षतोडीला आळा बसावा या उद्देशाने ग्रामपंचायत नारायणगावच्या पुढाकार घेतल्याने आज कोरोना आजाराच्या कालखंडात वैद्यकीय उपचारासाठी खर्च करून घरातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर यशस्वी मार्ग काढला आहे,
मीना नदीतीरी उभारण्यात आलेल्या शवदाहिनीच्या उपयुक्ततेसोबतच जनमाणसांची काळजी घेण्याच्या उद्देशाने शववाहिनीचे धुराडे जवळपास सव्वाशे ते दीडशे फूट उंच असल्याने शवदाहिनीतून निघणारा धूर हवेत विरून जाणार असल्याची आणि भविष्यात शववाहिनीच्या धुरापासून कुणालाही, कसलाही त्रास होणार नाही अशी माहिती लोकनियुक्त सरपंच श्री.बाबू पाटे यांनी दिली असल्याने जनसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.


0 टिप्पण्या